ग्राहकांची संतुष्टी हेच आमचे यश....

इंग्रजांनी भारतात चहा आणला आणि तो आपलाच झाला. इतका की सकाळचे वर्तमानपत्र चहाचा कप हातात घेतल्याशिवाय उघडल्याच जात नाही. घरगुती चर्चा असो वा कंपनीची महत्त्वाची मीटिंग चहाशिवाय उरकतच नाही. मित्र-मैत्रिणींचे रुसवेफुगवे असोत की शेअर मार्केटमधील चढ-उतार चहा सोबत लागतोच. पावसाळ्याच्या प्रत्येक सरीसोबत वाफाळता चहा तर हवाच हवा. कामामुळे आलेला शीण घालवायला तर चहा शिवाय दुसरा पर्याय तरी आहे का? अहो, आमच्या भारतीय संस्कृतीत तर चहाशिवाय लग्नाची बोलणीही आटपत नाही इतका तो आपल्यात भिनला आहे! तुमच्या आमच्या सुखदुःखात सहभागी होऊन तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनून गेलाय. या चहाला अधिक आनंददायी, अधिक दर्जेदार, उत्साहवर्धक पेय कसे बनवता येईल या दिशेने आमचे प्रयत्न सुरू होते. महा चहाच्या रूपाने ते पूर्णत्वास आले.

test

चहाच्या गुणवत्तेत महा चहा अग्रगण्य उत्पादन आहे. चहाची गुणवत्ता राखणे हे महा चहाचे प्रथम उद्दिष्ट आहे. हा चहा आरोग्यवर्धक आहे कारण यात रंग आणि चवीसाठी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक प्रक्रियेचा अवलंब यात केला जात नाही. उत्कृष्ट चहा निर्माण करण्यासाठी आम्ही स्टैंडर्ड मानकांचा वापर करतो. म्हणूनच महाचहा इतर चहापेक्षा वेगळा ठरतो. प्रत्येक वेळेस आपल्या कपात चहाची नैसर्गिक ,अस्सल व दर्जेदार चव पोहोचवणे हेच आमचे ध्येय होय. उत्कृष्ट नैसर्गिक उत्पादन आणि गुणवत्ता यांचा मिलाफ म्हणजे महा चहा होय.

महाराष्ट्राला खूप मोठी खाद्य परंपरा आहे. म्हणूनच महाचहा सोबत मुंबईचा वडापाव, पुण्याची स्पेशल मिसळ पाव याची जोड त्यास दिलेली आहे. अवीट चव आणि ताजेपणा हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

महाचहा...... स्त्री सशक्तिकरणाचे नवे दालन!

test

स्त्री जगातली अर्धी शक्ती आहे. निसर्गतः अनेक क्षमता तिच्यात आहे. स्त्री म्हणजे स्रुजन, स्त्री म्हणजे नवनिर्मिती,स्त्री म्हणजे शक्तीचा अमर्याद स्त्रोत! प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर होण्यासाठी वाटचाल करण्याची खरी गरज आहे. भारत सरकारनेही आता स्त्री सशक्तीकरणासाठी विशेष योजना राबविल्या आहेत. स्त्रीयांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे, आपल्या पंखात बळ आणावे, प्रगतीच्या नव्या वाटा शोधाव्यात, असा आमचाही मानसआहे. त्यादृष्टीने 'महाचहा' हे त्यांना उपलब्ध करून दिलेले नवे आकाश आहे. यात त्यांनी उत्तुंग भरारीची झेप घ्यावी, कर्तृत्वाच्या पताका फडकवाव्यात, त्यांच्या क्षमतांना आकार द्यावा, एक नवा भारत घडविण्यास सुसज्ज व्हावे, प्रगतीचे शिलेदार त्यांनी व्हावे, हीच आमची मनीमानसी इच्छा आहे.

  महिलांसाठी रोजगार निर्मिती व्हावी म्हणून महिलांना चालवण्यास महा चहाचे विशेष आउटलेट दिले जाईल. फ्रेंचायसी धारक होण्यापासून त्यात कार्यरत इतर कर्मचारीही महिलाच असतील. पाककलेत निपुण असणाऱ्या हातांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधीही त्यामुळे मिळेल. स्त्रियांनी आत्मनिर्भर होऊन स्वबळावर उभे राहण्यासाठी महाचहा हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे.

आपण इतरांन पेक्षा वेगळे का आहोत? हे बघा

ऑर्डर दिली

प्रसन्न ग्राहक

दैनिक ग्राहक

फ्रेंचायसीसाठी अर्ज करा